दुबईत अडकलेल्या पुणेकरांची सुरक्षित सुटका; १११ जण मायदेशी परत

पुणे (प्रतिनिधी) : अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात वाढलेल्या लष्करी संघर्षामुळे दुबईमध्ये अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील १११ रहिवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून ते मायदेशी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिली. सुरुवातीला पुण्यातील १८४ नागरिक संयुक्त अरब अमिरातीतील या शहरात अडकले होते. उर्वरित प्रवाशांना…








