Category बातम्या

कोकणातील शेतकऱ्याला गृहीत धरू नका; राजू शेट्टी

सिंधुदुर्गात आंबा, काजू प्रश्नी १२ मार्चला मोर्चा काढणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये आणि ३ लाख रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी, त्याचबरोबर इतर अनेक प्रश्नांच्या संदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी येत्या…

बांदा परिसरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींची भाजपच्या वतीने केली पाहणी

जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली घेतला आढावा बांदा (प्रतिनिधी) : बांदा परिसरातील अंगणवाड्यांच्या सुविधा व अडचणींचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देवगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देवगड येथील देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे रविवारी, दि. ८ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून Maharashtra Orthopaedic…

इस्कॉन व्हॅल्यू एज्युकेशन स्पर्धेत फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांचे सुयश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : इस्कॉन (ISCON) संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ‘व्हॅल्यू एज्युकेशन कॉन्टेस्ट’ (Value Education Contest) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट येथील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे प्रशालेचे आणि फोंडाघाट…

गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाची कारवाई

अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच मालवण (प्रतिनिधी) : अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच आहे. पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या…

खा. नारायण राणेंची बंड्या नारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत पालकमंत्री…

पोयरे मशवी वाडी येथे गोवा दारूचा साठा पकडला

देवगड ( प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पोयरे मशवीवाडी येथे आचरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे २ लाख ७ हजार ३६० रूपये किंमतीचा अवैध गोवा बनावटीचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तेथील संशयित योगेश विलास मयेकर याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात महाराष्ट्र…

मंडळ स्तरावर ७ मार्चला जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान

ओरोस (प्रतिनिधी) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजन करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आठ तालुक्यांच्या ग्रामीण भागांत शनिवार ७…

मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी मिळावा

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले आहे. नगराध्यक्षा…

ओरोस बुद्रुकमध्ये तरुणाची राहत्या घरी आत्महत्या; गावावर शोककळा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : हसतमुख स्वभाव, प्रत्येकांच्या मदतीला तत्पर धावून जाणारा आणि सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारा राकेश रविंद्र बोंद्रे (वय ३०, रा. ओरोस बुद्रुक) या तरुणाने राहत्या घरी दुपारी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावावर शोककळा पसरली…