Category मालवण

समुद्रात पडून खलाशी बेपत्ता

मालवण समुद्रातील घटना मालवण (प्रतिनिधी) : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेतील रुपेश गोपाळ जुवाटकर (रा. गाबीत केळी, ता. अंकोला, कारवार) हा खलाशी नौकेतून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मालवण समुद्रात घडली. याबाबत नौका मालक ऑलविन फर्नांडिस यांनी मालवण पोलीस…

नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवणच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

मालवण (प्रतिनिधी) : मुंबई-ठाणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवण येथील सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांच्या ज्ञानदा अॅक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. नित्यानंद मयुर मुरकर याने ‘बी’ गटातून प्रथम क्रमांक मिळवत्त सुवर्णयश मिळविले. श्रीनिका निखील नागवेकर हिने तृतीय…

शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा – तहसीलदार गणेश लव्हे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा 1) चौके येथे शुभारंभ आंबेरी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती चौके (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज…

बलात्कारसह पोक्सो च्या गुन्ह्यात 20 वर्षे जेलसह 30 हजारांचा दंड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील अकरावी मध्ये शिकत असलेल्या सुमारे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सॲप द्वारे ओळख निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील आरोपी अमृत उर्फ केतन सखाराम पालव याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर…

स्व. संजय नाईक जयंती दिनानिमित्त ५ किमी स्मृती दौड उत्साहात संपन्न

“ब्युटीज ऑन व्हिल्स” व संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : ८ मार्च २०२६ रोजी स्वर्गीय संजय नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ५ किमी स्मृती दौड उत्साहात पार पडली. स्व. संजय नाईक स्मृतीस्थळ पेंडूर ते ग्रामीण रुग्णालय कट्टा…

धक्कादायक | कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार

सुदैवाने शेलटकर बचावले : हल्लेखोर पसार : पोलिसांकडून शोध सुरु मालवण (प्रतिनिधी) : कोळंब खालची वाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्या दिशेने रविवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली. घराच्या परिसरात…

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. नारायण राणेंची भेट

मालवण (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे यांची भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. क्षमा संदीप हडकर, पंचायत समिती…

मेढा येथे ९ रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : मालवण-मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सवाचे आयोजन सोमवार, ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळी पूजा, दिवसभर दर्शन, नवस फेडणे व बोलणे, रात्री ८ वा. सामूहिक गाऱ्हाणे, रात्री १० वा. कलावंतीण…

गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाची कारवाई

अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच मालवण (प्रतिनिधी) : अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच आहे. पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या…

मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी मिळावा

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले आहे. नगराध्यक्षा…