Category कोकण

रामकृष्ण वासुदेवा | जागवी जनासी | टाळ मृदंग घोष | अभंग काकड

फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील काकड आरतीचा यशस्वी समारोप ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण- गणेश मंदिरात, प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, रोज पहाटे काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पेठेतील हा खेळिया या बालगोपाळांचे तथा ग्रामस्थांचे आराध्य असल्याने, रोज…

भाजपा महीला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महीलांचा उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात वेंगुर्ले शहरातील तसेच तालुक्यातील…

जानवली येथे दुचाकी आणि कारचा अपघात; पती-पत्नी जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल नीलम कंट्री साईड हॉटेलसमोर आज दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व इर्टिगा कार यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. लोरे (ता. कणकवली) येथील सुभाष नारायण गुरव (वय ५४) हे…

भाजपच्या ‘विशाल’ कार्यालयात बंद दाराआड वन-टू-वन चर्चा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील भाजपच्या विशाल कार्यालयात बंद दारा आड चर्चा सुरू असून जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असून ते इच्छुक कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधत आहेत. त्यांच्या सोबतीला पालकमंत्री…

सिंधुदुर्गात महायुतीला तडा ! स्वबळाचा सावंतवाडीतून नारा, भाजप कार्यालयाचे शानदार उद्घाटन

सावंतवाडी | कार्यकर्त्यांची निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने लढणार आहे. आतापर्यंतच्या भाषणाला माझं ‘मम्’ आहे. कमळ चिन्हाचा उमेदवार आपला असणार आहे. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा भाजपमय राहिलाय, तो यापुढेही राहील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी…

सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक म्हणून श्री. दिपक घोडे यांची नियुक्ती, पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी श्री. दिपक घोडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे दीपक घोडे यांनी आज सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेतली. जनतेला एसटीच्या…

गडीताम्हणे येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच व शाखाप्रमुख यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : गडीताम्हणे येथील उबाठा पक्षाच्या सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

सिंधुदुर्गचे खासदार, कुडाळचे आमदार वर्षभर गायब, खासदार,आमदारांच्या मॅनेजरांकडून मात्र लोकांना फसवी आश्वासने – वैभव नाईक

आचरा विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे खासदार, कुडाळ मालवणचे आमदार वर्षभर गायब आहेत, मात्र खासदार,आमदारांनी नेमलेले मॅनेजर वेगवेगळ्या गावात जाऊन कार्यकर्त्यांना फसवी आमिषे, खोटी आश्वासने देऊन शिंदे गटात प्रवेश घेत आहेत. ज्या…

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधव हिने सुवर्ण पदक पटकावले

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी आणि ११ व्या पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीची प्रज्योती जाधव हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच प्रणव कुडाळकर याने कास्य पदक पटकावले आहे.…

येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बांधवांसाठीही नुकसानभरपाईचे पॅकेज जाहीर करू – मंत्री नितेश राणे

कुणकेश्वर (प्रतिनिधी) : मत्स्यबंदीमुळे गेले तीन महिने मच्छीमार बांधवांना व्यवसाय करता आला नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आमच्या महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून त्यामुळे मत्स्यव्यवसायिक आणि मत्स्य कास्तकार हे आता शेतकरी दर्जाचे आहेत. येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच…