Category कोकण

ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी सिंधुदुर्गनगरीत मोर्चा आंदोलन

ओरोस (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा यांच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर देशभर टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येत आहे. या आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आज देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आंदोलन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय…

एचआयव्ही बाधित असल्याचे चुकीचे निदान; मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू

ओरोस (प्रतिनिधी) : एचआयव्ही बाधित असल्याचे चुकीचे निदान केल्यानंतर मृत पावलेल्या कै. गणपत सहदेव राणे यांच्या पत्नी आणि मुलग्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या प्रकारामुळे केवळ मृत्यूच नव्हे तर कुटुंबाची समाजात बदनामीही झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत…

भोंदूबाबा खरात प्रकरणात आमदार केसरकर अडचणीत? एसआयटी चौकशीपर्यंत राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचे नाव आणि त्यांच्यासोबतचे फोटो समोर आल्यामुळे सावंतवाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून ही अत्यंत चिंताजनक व लाजिरवाणी बाब आहे, असा संतप्त आरोप काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ.…

नगरपालिकेचा बेजबाबदारपणा! पाण्याअभावी सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा; रुग्ण आणि महिलांचे हाल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील उभा बाजार परिसरातील औदुंबर प्लाझा समोर असलेले नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाण्याअभावी अस्वच्छतेचे केंद्र बनले असून, प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर दुर्भाटकर यांचे क्लिनिक…

कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज सलग तिसऱ्या वर्षी निनादनार मध्यप्रदेश मध्ये

रामनवमी निमित्त सिंधुगर्जनाचे २५० वे वादन मध्यप्रदेशातील टीकमगढ मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या २७ मार्च रोजी २५० वे वादन करण्यासाठी आज सायंकाळी कणकवली…

शहीद दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी अत्यंत कमी वयात प्रगल्भ…

पावशीत मुंबई-गोवा हायवेवर टायर जाळले

अज्ञाताच्या कृत्याने पोलिसांची धावपळ कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी पावशी-घावनळे फाट्याजवळ अज्ञातांनी टायर पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. ऐन महामार्गावरच टायरला आग लावल्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. आज (सोमवारी) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही घेतल्या जाणून सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर…

अवैध खैर लाकूड वाहतुकीला वनविभागाचा ब्रेक

10 लाख किंमतीच्या खैर लाकडासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : साधारण आठ दिवसांपूर्वीच इन्सुली बांदा राज्य मार्गावर वनविभागाने खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पो पकडला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला…

उत्तम धाकु वंजारे यांना सहाय्यक पोलीस फौजदार पदी बढती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलातील आचरा पोलिस स्टेशनचे हवालदार व बेळणे आउट पोस्टचे इनचार्ज उत्तम धाकु वंजारे यांना नुकताच सहाय्यक पोलीस फौजदार (ए. एस. आय.) पदी बढती मिळाली. सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे हस्ते, एका कार्यक्रमात वंजारे…