Konkan News

Konkan News

कलमठला दर दिवशी ३ लाख लिटर पाणी मिळणार.!

नगराध्यक्ष संदेश पारकर व कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या उपस्थितीत कलमठ ला पाणी पुरवठा सुरू.! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सांडपाणी गडनदीपात्रात सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले. नदीपात्रातील पाण्यावरील कलमठ गावची नळपाणी योजना बंद पडली आहे. त्यामुळे कलमठ…

जाणवली बौद्ध विकास संघाचे प्रमुख सल्लागार धर्माजी पवार यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली बौद्ध विकास संघ, मुंबई येथील सर्व सभासदांना अत्यंत दुःखद बातमी देण्यात येत आहे की, संघटनेचे प्रमुख सल्लागार आयु. धर्माजी गणपत पवार यांचे आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले…

पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नका

नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल,…

वैभववाडीला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका

निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित…

वाढदिवसानिमित्त कणकवलीत मा.आ. वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी…

खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी नुकतीच खारेपाटण येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्याला सदिच्छा भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात नोंद असलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण शहराला भेट देऊन मानला समाधान वाटले…

फरीद काझिंकडून महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांचे अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापतीपदी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या जि. प. सदस्य अनुराधा महेशकुमार नारकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. महिला बालकल्याण सभापतीपदी अनुराधा नारकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक सेल देवगड…

कणकवलीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस

उकाड्यापासून दिलासा, मात्र गारांमुळे नुकसानाची भीती कणकवली (प्रतिनिधी) : दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कणकवली शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून प्रचंड उकाडा आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला…

कणकवलीत पेट्रोल-डिझेल टंचाई; वाहनचालक हैराण

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात सध्या पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे बस स्थानक शेजारील तसेच पोलीस स्थानकाजवळील दोन पेट्रोल पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अचानक उद्भवलेल्या या…

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) अंतर्गत दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १८ मार्च रोजी सकाळी १०:३० ते दि.…