Category बातम्या

आभाळमाया ग्रुप आयोजित सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके (प्रतिनिधी) : मालवण कट्टा येथे लक्ष्मीपूजनानिमित्त घेण्यात आलेल्या सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २५ जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्या आलेल्या पाच स्पर्धकांना समान रक्कमेचे बक्षीस आणि आभाळमाया ग्रुपचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी…

रिपब्लिकन सेनेच्या सिंधुदुर्ग उत्तर जिल्हाध्यक्षपदी रमेश बावडेकर

वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव यांची निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश बावडेकर तर वैभववाडी तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र जाधव आजविलकर यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच मुंबई येथे…

दक्षिण कोकणची काशी उजळलीलक्ष लक्ष दिव्यांनी!!!

कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून 22 ऑक्टोबर रोजी रात्री मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल २१ हजार तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून…

ऐन दिवाळीत ओमकार हत्तीचा मडुऱ्यात धुमाकूळ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. मडुरा गावात हत्तीने अक्षरशः थैमान घातलं असून, घराशेजारी उभ्या असलेली मोटारसायकल पाडून त्यातवर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एका व्हिडिओत व्हायरल झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर…

तुळस येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

62 रक्तदात्यांनी केले पुण्यदान वेंगुर्ले (प्रतिनिधी) : “रक्तदान हीच खरी जीवनदानाची साधना” या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य…

एसटी – मोटरसायकल अपघातात युवती ठार

मृत युवती फोंडाघाट मधील ; स्वतःची लग्नपत्रिका मामाच्या घरी ठेवून परतत असताना घडली दुर्घटना कणकवली (प्रतिनिधी): तालुक्यातील कसवण – तळवडे (बौद्धवाडी) येथील रस्त्यावर एसटी बस आणि मोटरसायकल मध्ये झालेल्या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेल्या युवतीचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निकिता…

महाऍग्री कंपनीच्या महाशक्ती वाण पीक पाहणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाऍग्री कंपनीच्या ‘महाशक्ती ‘या वानाचा पिक पहाणी कार्यक्रम शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकले खोल, आरवली -शिरोडा येथे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन प्रगतशील शेतकरी अशोक मंत्री यांनी पिकवलेल्या महाशक्ती या वानाचा प्लॉट दाखवण्यात…

प्रज्योती जाधव राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्या मंदिर कनेडी व ज्यु कॉलेज…

पळसंब गावचे माजी उपसरपंच सुहास सावंत यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावचे माजी उपसरपंच व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुहास सहदेव सावंत ( 35 वर्षे ) यांचे उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे निधन झाले. उपसरपंच असताना शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पळसंब देवस्थान ट्रस्ट विश्वस्त…

सिंधुदुर्ग पोलिसांचा जेष्ठ नागरिकांशी सुसंवाद उपक्रम

ओरोस(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी…