Category बातम्या

जाणवली गावठणवाडी येथे कार-दुचाकी अपघात; दुचाकीस्वार जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीहून तळेरेच्या दिशेने जात असलेल्या कारला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास जाणवली गावठणवाडी बस थांब्यानजिक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कणकवलीहून तळेरेच्या दिशेने कार जात असताना…

उभादांडा समुद्रकिनाऱ्यावर ३०० ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना जीवदान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील उभादांडा समुद्रकिनाऱ्यावर २१ फेब्रुवारी रोजी संवर्धित केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाच्या २९ घरट्यांपैकी एका घरट्यातून आज बाहेर आलेल्या सुमारे ३०० ऑलिव्ह रिडले कासवाच्या पिल्लांना पंचायत समिती सभापती शंकर घारे व उभादांडा सरपंच निलेश चमणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ही असणार प्रमुख उपस्थिती

वाढदिवस सोहळा ठरणार सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासातील लक्षवेधी क्षण कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून, या भव्य सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची…

खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या…

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील विविध…

खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व…

खा. नारायण राणेंच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्ष पदार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती

कणकवली येथे १० एप्रिल रोजी अपूर्व उत्साहात साजरा होणार वाढदिवस राज्यातील मंत्री,नेते यांच्यासह पार्श्वगायक सोनू निगम सिने अभिनेता संजय दत्त यांची असणार प्रमुख उपस्थिती सायंकाळी ६ वाजता नरडवे नाका येथे होणार वाढदिवस साजरा कणकवली ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राच्या राजकारणातील…

आंबा काजू शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या औषध कंपन्यांवर कारवाई करावी

मा. खा. राजू शेट्टी यांची कृषी आयुक्तांकडे मागणी पुणे (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना…

चांदोशी तिठ्यावर अर्धवट रस्ता; बॅरिगेट्स नसल्याने अपघात – नागरिकांमध्ये संताप

नांदगाव (स्वप्निल तांबे) : देवगड-नांदगाव मार्गावर चांदोशी तिठ्या नजीक सध्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, या ठिकाणी मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. देवगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम काही फूट आधीच थांबवण्यात आले असून रस्त्याची कडा तशीच उघडी ठेवण्यात आली आहे.…