Category देवगड

देवगडचा नाट्यमहोत्सव पुणे – मुंबईप्रमाणे दर्जेदार : नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये देखील दर्जेदार नाट्य संस्कृति असून तरुणांनी उभारलेला नाट्य महोत्सव हा पुणे-मुंबईप्रमाणे दर्जेदार सांस्कृतिक व्यासपीठ आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी त्यांनी १ मे, महाराष्ट्र…

ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत; ग्रामसचिवालयातूनच विकासाला गती – नितेश राणे

सर्व कारभार एकाच इमारतीतून झाल्यास नागरिकांना सुविधा देणे सोपे तिर्लोट ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण उत्साहात देवगड (प्रतिनिधी) : “ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत. कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास व ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व कारभार एकाच इमारतीतून चालल्यास नागरिकांना सुविधा देणे अधिक सोपे…

पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत युथ फोरम-देवगडच्यावतीने नाट्य महोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे पुरस्कृत व युथ फोरम-देवगड या संस्थेच्यावतीने ‘देवगड नाट्यकलेला रंगमंचाची साथ’ या संकल्पनेला अनुसरुन यावर्षीच्या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य महोत्सवाचे हे द्वितीय वर्ष…

पडवणे समुद्रकिनाऱ्यावर युवतीचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी २५ वर्षीय अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवणे येथील समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह…

आनंदवाडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा उद्या वर्धापन दिन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड आनंदवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा २९ वा वर्धापन दिन सोहळा व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुर्नः प्रतिष्ठापना सोहळा २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी…

वरेरी येथील विवाहिता बेपत्ता

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी बौध्दवाडी येथील सौ. सपना संदीप जाधव (३६) ही विवाहीता बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती संदीप प्रकाश जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. सपना जाधव ही विवाहिता १८ एप्रिल रोजी दुपारी…

कालवे काढताना युवकाचा बुडून मृत्यू; मृतदेह वाडातर खाडी किनारी आढळला

देवगड (प्रतिनिधी) : कालवे काढताना खाडीच्या पाण्यात बुडालेल्या प्रदीप चंद्रकांत बाईत (३३, रा. नाडण वीरवाडी) या तरुणाचा मृतदेह वाडातर हनुमान मंदिरानजीकच्या मागील बाजूस सोमवारी सकाळी ६.१५ वा. च्या सुमारास खाडी किनारी आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात…

वाघाच्या हल्ल्यात गाभण गायीचा मृत्यू

साळशीतील शेतकरी सिताराम साळसकर यांचे नुकसान; परिसरात भीतीचे वातावरण शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील शेतकरी सिताराम महादेव साळसकर यांची गाभण गाय वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. साळसकर यांनी ही गाय चार दिवसांपूर्वी रानात चारण्यासाठी सोडली…

देवगड महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे यश

देवगड (प्रतिनिधी) : दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल ग्राज्युएट फिजिक्स एक्झामिनेशन (NGPE) मध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. कु. नुपूर मकरंद लळित (तृतीय वर्ष), कु. प्रेरणा शंकर गोसावी (तृतीय वर्ष) व कु. आर्यन रामदास गुरव (प्रथम वर्ष)…

देवगडमध्ये 24 तासांपासून वीज खंडित; भाजपाचा महावितरणवर हल्लाबोल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेज रोड परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर आणि शाखा अभियंता छाया परब…