Category कोकण

मालवणात ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

शोधणाऱ्यास १० हजारांचं बक्षीस जाहीर मालवण (प्रतिनिधी) : शहरातील श्री. सुधाकर गणपत नरे (वय ७३) हे घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ते राहणार मालवण, जि. सिंधुदुर्ग असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.…

पडवणे समुद्रकिनाऱ्यावर युवतीचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी २५ वर्षीय अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवणे येथील समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह…

पोलिस पाटीलांचे जिल्ह्यांत लवकरच प्रशिक्षण आयोजित करू

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अभाअंनिसला दिले आश्वासन अभाअंनिसचे जिल्हासंघटक विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याची ग्वाही ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात खरात आणि अन्य भोंदू बाबांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्या…

सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संपाचा इशारा

महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनची आक्रमक भूमिका प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रणया…

करूळ चव्हाटा येथील श्री देव महापुरुष जागृत हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उदंड उत्साहात संपन्न !

“बायकोशिवाय काय खरा नाय ” फोंडाघाटच्या विठ्ठल सावंत यांच्या मालवणी नाट्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील करूळ चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळपासूनच मंदिराला फुलांची आरास,…

आनंदवाडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा उद्या वर्धापन दिन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड आनंदवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा २९ वा वर्धापन दिन सोहळा व श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती पुर्नः प्रतिष्ठापना सोहळा २३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी…

नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू कुडाळ भंगसाळ नदीतील दुर्घटना

कुडाळ (प्रतिनिधी) : शहरातील कवीलकाटे परिसरातील भंगसाळ नदीपात्रात मंगळवारी सायंकाळी पोहायला गेलेल्या 21 वर्षीय युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव नितीन बांदेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या वैभवचा असा अकस्मात मृत्यू झाल्याने कुडाळ शहरात हळहळ…

सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल सुरु करण्याच्या हालचालींना वेग.; निविदा प्रक्रिया जाहीर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात पोहोचत असताना सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावरून मे महिन्यापासून पथकर वसुली सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. येत्या २४…

अपघाती मयताच्या मोबाईल नंबरचा तपासी अधिकाऱ्याकडूनच गैरवापर ?

रक्षकच बनला भक्षक; मृताच्या नातेवाईकाकडून न्यायाची अपेक्षा जिल्ह्याच्या बॉर्डरवरील पोलीस ठाण्यातील प्रकाराने खळबळ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे मोबाईल सिमकार्ड वापरून त्या नंबरवरून आक्षेपार्ह मेसेज करणे तसेच गैरवापर केल्याची तक्रार त्या मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केल्याचे समजत…

वरेरी येथील विवाहिता बेपत्ता

देवगड (प्रतिनिधी) : वरेरी बौध्दवाडी येथील सौ. सपना संदीप जाधव (३६) ही विवाहीता बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे पती संदीप प्रकाश जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सौ. सपना जाधव ही विवाहिता १८ एप्रिल रोजी दुपारी…