प्लास्टिकचा हादैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा’ -चिंदर सडेवाडी येथील चिमुकल्याच्या कलाकृतीतून पर्यावरणाचा एल्गार…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी-गोसावीवाडीतील एका शालेय विद्यार्थ्याने ‘प्लास्टिक’ रुपी राक्षसाची (दैत्याची) कलाकृती सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले. “प्लास्टिकचा हा दैत्य मातला, बंदीत केले देह मानवाचा,” हा ज्वलंत संदेश देत या चिमुकल्या कलाकाराने पर्यावरणाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला…








