Konkan News

Konkan News

कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : स्वामीसेवक कै. कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण व पूजन सोहळा तसेच…

श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर होणार १४८ व्या श्री स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पुजन अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन शुक्रवार दि. २० मार्च रोजी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये विविध पारंपारीक धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार…

लेखन व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर !

लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड सावंतवाडी (प्रतिनिधी) : नाटककार कवी कार्यकर्ते आणि निष्ठावंत प्राध्यापक अशी ओळख असलेल्या प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे अकाली निधन झाले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या साहित्यिक…

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल -महेश गुरव

दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात…

राष्ट्रीय लोक अदालतीत एकाच दिवशी ९२१ प्रकरणांचा निपटारा

तडजोडीतून १.८७ कोटी रुपयांची सेटलमेंट; पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवारी (दि. १४ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी तब्बल ९२१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये…

एसटी कामगारांच्या १८ मागण्यांसाठी कुडाळमध्ये ‘एल्गार’

राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर पार पडले. या अधिवेशनात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो एसटी कामगारांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रलंबित असलेल्या विविध १८ मागण्यांबाबत यावेळी महत्त्वपूर्ण…

प. पू. सुवर्ण (हसरे) महाराज समाधिस्त ; राणे महाराज मठ येथे उद्या सकाळी अग्निसंस्कार

दर्शन घेण्यासाठी राणे महाराज मठात भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : प.पू. हसरे महाराज शुक्रवार दि. १३ मार्च रोजी सायंकाळी समाधिस्त झाले. त्यांचे वय ७० वर्ष होते. त्यांचे मूळ गाव मुंबई माहीम असून त्यांचे पूर्ण नाव सुवर्ण भास्कर चिंचणकर…

आ. निलेश राणेंची वाढदिवसाची कुडाळात जय्यत तयारी

आगळावेगळा वाढदिवस; उत्सुकता शिगेला कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी कुडाळ एस.टी. डेपोच्या मैदानावर भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. मात्र, यंदा या सोहळ्याचे स्वरूप कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नसून, केवळ जनतेचा आशीर्वाद…

देवगडात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निधी वितरण

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसीलदार कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) 22 वा हप्ता वितरण ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी गणेश राणे (सभापती) पंचायत समिती देवगड, अमोल लोके (उपसभापती) पं.स. देवगड,. अजितराव गोगटे (माजी आमदार),…

जिल्ह्यात २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू होणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष…