Konkan News

Konkan News

मालवण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेतर्फे २४ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना नळयोजनेचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात येणार आहे. सर्व नळधारकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मालवण पालिकेच्या शहर…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगीवे येथे मासे भरलेला कंटेनर पलटी

वाहनचालक किरकोळ जखमी खारेपाटण (संतोष पाटणकर ) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगीवे या गावात एका अवघड वळणावर आज पहाटे रत्नागिरी वरून आलेला केरळ च्या दिशेने जाणारा कंटेनर वाहनचालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने झालेल्या…

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २४ रोजी कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या एप्रिलच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी, २४ रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘रंग-संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नाटक आणि प्रेक्षक यांचे नाते उलगडणाऱ्या या कार्यक्रमात नाट्यकर्मी, निवेदक नीलेश पवार हे रसिकांशी संवाद साधणार आहेत. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग ‘प्रणित…

कणकवलीत दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला जाऊन…

मालवणात ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

शोधणाऱ्यास १० हजारांचं बक्षीस जाहीर मालवण (प्रतिनिधी) : शहरातील श्री. सुधाकर गणपत नरे (वय ७३) हे घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ते राहणार मालवण, जि. सिंधुदुर्ग असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.…

पडवणे समुद्रकिनाऱ्यावर युवतीचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी २५ वर्षीय अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह २१ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवणे येथील समुद्रकिनारी एका महिलेचा मृतदेह…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या…

पोलिस पाटीलांचे जिल्ह्यांत लवकरच प्रशिक्षण आयोजित करू

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अभाअंनिसला दिले आश्वासन अभाअंनिसचे जिल्हासंघटक विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याची ग्वाही ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात खरात आणि अन्य भोंदू बाबांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना आपल्या…

सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; संपाचा इशारा

महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनची आक्रमक भूमिका प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेमार्फत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात प्रणया…

करूळ चव्हाटा येथील श्री देव महापुरुष जागृत हनुमान मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उदंड उत्साहात संपन्न !

“बायकोशिवाय काय खरा नाय ” फोंडाघाटच्या विठ्ठल सावंत यांच्या मालवणी नाट्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील करूळ चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळपासूनच मंदिराला फुलांची आरास,…