Category बातम्या

स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी यशोदा कांबळी यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील यशोदा शंकर कांबळी (वय ८७) यांचे आज (ता.३१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्या स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक शंकर कांबळी यांच्या पत्नी होत. शंकर कांबळी यांनी आझाद हिंद सेनेत सेवा बजावली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशोदा कांबळी यांनी…

हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथे भव्य उत्सवाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त कोष्टेवाडी येथील श्री हनुमान नगर परिसरात यंदाही भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मित्रमंडळ कोष्टेवाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. सकाळी ६ ते…

शिक्षक समितीचा सामाजिक बाणा; आजारी विद्यार्थिनीला मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. कळसुली सुद्रिकवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हर्षिता नंदकिशोर सुद्रीक ही कर्णदोषामुळे आजारी असून, तिच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी संघटनेच्या वतीने १०,०००…

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडणार!

कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच ! उपनगराध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले…

जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ३१ मार्च व १ एप्रिल या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील नौका; नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण (प्रतिनिधी) : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या…

काजू चोरी पडली महागात…

एलसीबीच्या दमदार कामगिरीने टोळी गजाआड केली कणकवली (प्रतिनिधी) : कोंडये गावातील वरचीवाडी येथे दत्तात्रय विठ्ठल तेंडुलकर यांच्या काजू बागेतील शेतमांगरामधील ठेवलेल्या सुमारे दोन टन, तीन लाख वीस हजार रुपयांच्या काजू बियांच्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणने उत्कृष्ट कामगिरी कर करत…

कणकवली तहसिलदार कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब योजनेतून 38 लाभार्थ्यांना होणार लाभ

कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्या विशेष मोहिमेला आले यश योजनेचा माध्यमातून 7 लाख 60 हजार रुपयांचा होणार लाभ कणकवली (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात या मत्स्य व बंदरे विकास मंत्री व पालकमंत्री नितेश राणे…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी…

सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने लेखी निवेदन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना…