Category बातम्या

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई मातोश्री येथे बैठक संपन्न मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विकास कामांचा आढावा; पाणीपुरवठा, रस्ते व क्रीडा संकुलांना गती देण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस…

नुकसानग्रस्त आंबा बागायतदार पोचले मातोश्रीवर

राजू शेट्टींसह, ठाकरे सेनेच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेंची घेतली भेट 15 मे ला मुंबईत धडकणार आक्रोश मोर्चा ब्युरो न्यूज (मुंबई) : गेल्या दोन महिन्यांपासून मदतीसाठी टाहो फोडणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये…

सिंधुदुर्गात पंडित दीनद्याळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान उत्कृष्ट राबविल्या बद्दल भाजप प्रदेश कडून कौतुक

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कडे जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई यांज कडुन अहवाल सुपूर्त वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण…

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड! RPF ची धडक कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करताना आढळल्या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (वय ५५, रा. नेरूर, कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या मंगळवारी…

कर्नल विजय सावंत यांचे कनेडी विद्यालयात इंग्रजी व्याकरण मार्गदर्शन

कनेडी (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २३ एप्रिल २०२६ दरम्यान इंग्रजी व्याकरण विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात भिरवंडे गावचे सुपुत्र तथा सध्या पुणे…

खाते प्रमुखांच्या अनुपस्थितीवर सदस्यांचा संताप; “सभेला येण्याचा उपयोग काय?”

वैभववाडी (प्रतिनिधी) : मागील सभेत सूचना करूनही याही सभेला खाते प्रमुख उपस्थित राहत नसतील, तर आम्ही तरी सभेला कशासाठी उपस्थित राहायचे? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थित केला. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह…

तीन वर्षांचा विज्ञान प्रदर्शन खर्च प्रलंबित; शिक्षण समितीत प्रशासनावर ठपका

शिक्षण विभागाची मोठी चूक उघड; १५ लाखांचे दायित्व, चौकशीचे आदेश ओरोस (प्रतिनिधी) : चार वर्षे प्रशासकीय राजवट असताना शिक्षण विभागाने जिल्ह्यात झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचा खर्च केला नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या…

वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे शनिवार २५ एप्रिल रोजी लोकार्पण

श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची असणार उपस्थिती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे प्रत्येक गावात हिंदवी स्वराज्याचा ध्वजस्तंभ उभा करण्याचा संकल्प असून वेंगुर्ले तालुक्यातील पहिल्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण वेंगुर्ले कॅम्प येथे शनिवार २५ एप्रिल…

ओरोस येथे युवतीची गळफासाने आत्महत्या

ओरोस (प्रतिनिधी) : ओरोस जैतापकर कॉलनी येथील जीवन प्रकाश कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी वसंत पारधी या २६ वर्षीय युवतीने राहत्या घरातील फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मानसिक आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत समोर आले आहे. ओरोस पोलीस…