Category बातम्या

एसटीच्या हंगामी भाडेवाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना उन्हाळ्यात सुट्टी कालावधीत लागू केलेल्या हंगामी भाडेवाढीचा ‘जोर का धक्का… पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी परिवर्तनशील भाडेवाढ लागू केली असून ती १५ एप्रिल ते १५ जूनसाठी लागू…

बंदर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम – मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. विद्यमान आयटीआय इमारतींमध्येच विद्यार्थ्यांना…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाशी संबंधित विविध प्रकल्प, धोरणे आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत शिवनीबांध…

दिव्यांगांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा धडाका; प्रशासनाला सुनावले खडेबोल

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या बैठकीवर दिव्यांगांचा आक्षेप कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र, नोकरी भरतीत प्राधान्य, रोजगार यांसारख्या मागण्यांकडे लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या…

पोलिस उपनिरीक्षकपदी निकिता एडवेंना बढती

कणकवली (प्रतिनिधी) : महिला अत्याचार निवारणकक्षामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या निकिता बाळकृष्ण एडवे यांना पोलिस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. निकिता एडवे शासनाच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. एडवे यांनी सिंधुदुर्ग…

बळीराजाचे डोळे आभाळाकडे; पावसाअभावी भात पिकांवर संकट

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मान्सूनने वेळेत हजेरी लावली असली तरी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाच्या भरोशावर भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.मान्सूनच्या आगमनानंतर जिल्हाभरात भात पेरणीला वेग आला. अनेक…

बांधकाम विभागातील बोगस सह्या प्रकरणी राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जि.प.मध्ये आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या (बोगस) सह्या करून कामांची बिले काढण्याच्या गंभीर प्रकाराबाबत संबंधित सर्व दोषी ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, तोपर्यंत आम्ही आपले दालन सोडणार नाही तसेच…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप दत्ताराम श्रावणकर हे लवकरच या जून महिन्यात सेवा निवृत्ती होणार असल्या कारणाने ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण यांच्या वतीने त्याचा सेवानिवृत्ती…

CNG वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

कणकवली वागदेतील CNG पंप आजपासून सुरु कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड मार्फत CNG पंप नाईक पेट्रोलियम वागदे येथे मंगळवार १६ जून २०२६ रोजी पासून सुरू करण्यात येणार आहे. नाईक पेट्रोलियम वागदे यांच्या व्यवस्थापनच्यावतीने ही माहिती देण्यात आली. कणकवली…

माय युवा भारत सिंधुदुर्गच्या पुढाकाराने युवकांचा सक्षम सिंधुदुर्गसाठी हुंकार !

पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, कौशल्य विकास आणि स्वच्छ पर्यटनासाठी तळेरेतील विद्यार्थ्यांची प्रभावी जनजागृती तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यसनमुक्त, कौशल्यसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने “सक्षम सिंधुदुर्ग” या विषयावरील जनजागृतीपर पथनाट्य नुकतेच उत्साहात सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी…