Category कणकवली

मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात…

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावी (PCB व PCM) विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन, सराव व आत्मविश्वास निर्माण…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ

सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते झाले. या उपक्रमांतर्गत १४ वर्षे पूर्ण ते…

कलमठ येथे हयात दाखला शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यांचे वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान अंतर्गत आयोजन ग्रामपंचायत कलमठ व ग्राम महसूल कार्यालयचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सुशासन युक्त प्रशासन संकल्प अंतर्गत कलमठ गावातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कलमठ आणि ग्राम महसूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…

कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कणकवली येथील मराठा समाज मंडळ हॉल येथे पार पडणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायकांना आपली कला सादर…

कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज सलग तिसऱ्या वर्षी निनादनार मध्यप्रदेश मध्ये

रामनवमी निमित्त सिंधुगर्जनाचे २५० वे वादन मध्यप्रदेशातील टीकमगढ मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या २७ मार्च रोजी २५० वे वादन करण्यासाठी आज सायंकाळी कणकवली…

अखेर आंबा काजू उत्पादक रस्त्यावर उतरले

कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू शेतकरी नांदगाव येथे महामार्ग रास्ता रोको साठी एकवटले. हे सर्व उत्पादक अखेर आता महामार्गावर उतरले असल्याने महामार्ग बंद झाला होता. आंबा काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे,…

“वाचनसंस्कृतीच माणसाला घडवते” – गोपुरी आश्रमात दिनेश राणे यांचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमाच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संचालक मंडळावर निवड झालेल्या दिनेश राणे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तथा सेवानिवृत्त शिक्षक जी. ए. सावंत यांच्या हस्ते राणे यांचा गौरव करण्यात आला.…

संदेश सावंत यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कनेडी (प्रतिनिधी) : जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस विविध धार्मिक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. यात २३ व २४ मार्चला वृद्ध, गरीब भाविकांसाठी ज्योतिबा, पंढरपूर, नरसोबाचीवाडी, तुळजापूर देवदर्शन, २९ मार्चला सकाळी सांगवे-कनेडी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिल्या अबिद नाईकांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी जात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकेकाळी कणकवली शहराच्या राजकारणात संदेश आणि अबिद ही जोडी नेहमी दिसून येत होती. काळाच्या ओघात बदलत्या संदेश पारकर आणि…