Category शैक्षणिक

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कु. मंदार जाधव यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षांमध्ये कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु. मंदार जीवदास जाधव इ.५ वी यांने घवघवीत यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थी नवोदय विद्यालयात इ. ६ वी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. या यशस्वी विद्यार्थ्याला एस.एस. पेडणेकर,…

केरवडे तर्फे माणगाव जि. प. प्राथ. शाळा व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळा नं. १ शाळेला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात तालुक्यात १ नंबर असलेली व केरवडे तर्फे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक यांनी ह्याच्या सरपंच श्रिया…

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी…

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात बारावी (PCB व PCM) विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर १६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत विशेष क्रॅश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन, सराव व आत्मविश्वास निर्माण…

तनुष धोंडू चिंदरकर गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय

आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा (G.T. S) 2025-26 चिंदर गावचा सुपुत्र तनुश धोंडू चिंदरकर याने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर भटवाडी येथे इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुश याने…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

इयत्ता तिसरीतील अलिशा इसप देशात 38 वी व समर्थ ठाकूर देशात 50 वा खारेपाटण (प्रतिनिधि) : नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले असून या परिक्षेत इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी अलीशा…

जीवन शिक्षण विद्यामंदिर केंद्र शाळा फोंडा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांचे ‘युवा संदेश प्रतिष्ठान’ परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं. १ येथील इयत्ता २ री, ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षा प्रमाणेच यावर्षीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचा…

संजय आग्रेंनी घेतली शिक्षणमंत्री दादा भूसेंची भेट !

सिंधुदुर्गातील माध्य. शिक्षण विभागातील त्रुटींकडे वेधलं लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील त्रुटी संदर्भात एकनाथ शिंदे शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते.…

एसएसपीएम च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे ‘एमएचटी-सीईटी २०२६ क्रॅश कोर्स’ चे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : एस.एस.पी.एम. च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवलीत महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (MHT-CET) २०२६ ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनपर ऑफलाइन क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यातील सराव, संकल्पनात्मक स्पष्टता आणि परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी या…

नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवणच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

मालवण (प्रतिनिधी) : मुंबई-ठाणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवण येथील सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांच्या ज्ञानदा अॅक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. नित्यानंद मयुर मुरकर याने ‘बी’ गटातून प्रथम क्रमांक मिळवत्त सुवर्णयश मिळविले. श्रीनिका निखील नागवेकर हिने तृतीय…