Category कणकवली

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका -प्रशासनाचा इशारा !

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून…

कणकवली शहरात ४०० रूपयांची घरपट्टी होणार ४ हजार

नगरपंचायत सभेत प्रशासनाची माहिती पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जुन्या घरांना ग्रामपंचायत दरानुसार घरपट्टीची आकारणी होत आहे. एक हजार चौरस फुटांच्या जुन्या घरांसाठी सध्या चारशे रूपये घरपट्टी आकारली जाते. मात्र नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायतीच्या…

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे – वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : मी ठामपणे शिवसेना पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे जिल्हाप्रमुख पद स्विकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या…

हळवल श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा उद्या ५ मे रोजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवळ येथील ग्रामदेवता श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा ११ वा वर्धापन दिन मंगळवार, ५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाची…

कणकवलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; ३ पंप बंद, सीएनजीसाठी वाहनांच्या लांब रांगा

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात अचानक पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. टँकर वेळेत न आल्यामुळे शहरातील तब्बल तीन पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून, बसस्टँड, पोलीस ठाणे आणि वागदे परिसरातील पंप पूर्णपणे…

कणकवलीत वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल ; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

CNG पंपाजवळ पार्किंग नियोजनाचा अभाव वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्या कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक दरम्यान रविवारी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून सुमारे अर्धा तासाहून अधिक…

तळेरे बसस्थानकाजवळ अपघात; संतप्त प्रवाशांकडून बस चालकाला मारहाण, बसची तोडफोड

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकाजवळ दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास एका लग्झरी बसने (MH04MH4747) दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी…

डामरेत राहते घर जळून खाक; पावणे दोन लाखांचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील डामरे वरवचिवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3 मे रोजी मध्यरात्री…

कलमठ गुरववाडी येथे ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला..

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्निल चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस येत रोखण्यात आल्याची घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ…

आई आणि मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण

४८ व्या वर्षी अंगणवाडी सेविकेची गगनभरारी कणकवली (प्रतिनिधी) : ‘शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते’ हे कळसुली येथील सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून, या माय-लेकींनी समाजासमोर एक…