Category कोकण

कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्तः दोन तास राबवली मोहीम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून गावातील काही रस्ते प्लास्टिक मुक्त करण्यात…

वारगाव येथील श्री आदिष्टी माता मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम दि.२२ ते २४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होणार

यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, संस्कृतिक कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजन खारेपाटण (संतोष पाटणकर ) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगीवे व वारगाव या दोन गावांना जोडणारी घाटात वसलेली श्री देवी आदिष्टी माता या देवीच्यानव्याने बांधण्यात आलेल्या सुंदर मंदीराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा…

तरुण खेळाडूची चमकदार कामगिरी

मंथन उकरडेची ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकमध्ये झेप कणकवली (प्रतिनिधी) : केवळ १२ वर्षांचा असलेला मंथन पराग उकरडे याने ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या खेळप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत तो सहभागी झाला होता. ही निवड…

देवगड महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे यश

देवगड (प्रतिनिधी) : दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल ग्राज्युएट फिजिक्स एक्झामिनेशन (NGPE) मध्ये भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. कु. नुपूर मकरंद लळित (तृतीय वर्ष), कु. प्रेरणा शंकर गोसावी (तृतीय वर्ष) व कु. आर्यन रामदास गुरव (प्रथम वर्ष)…

देवगडमध्ये 24 तासांपासून वीज खंडित; भाजपाचा महावितरणवर हल्लाबोल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेज रोड परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता राहुल निमकर आणि शाखा अभियंता छाया परब…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार साक्षी सुनील…

सोन्याचे आमिष दाखवून सलून व्यावसायिकाला पाच लाखा चा गंडा…

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील मठ कुडाळतीठा (मुळ रा. शहापूर, बेळगाव) येथील सलून व्यावसायिक रोहन गजानन कडगावकर यांची दोन अज्ञात इसमानी सोन्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली…

वागदे आर्यादुर्गा नगरात गवारेड्याची एन्ट्री

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे आर्यादुर्गा नगर परिसरात शुक्रवारी पहाटे एक गवारेडा शिरल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. हा गवा रेडा शुक्रवारी पहाटे ६.२४ वाजता आर्यादुर्गा मंदिराच्या पुढ्यातून नमसवाडी मार्गावरून धावत गेला. त्या मागून काही वेळातच पहाटे येणारी बस या मार्गावरून गेली.…

आरवली वेतोबा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, २१ एप्रिल रोजी होणार आहे. यानिमित्त १९ ते २३ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री…

खत कंपन्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी – विठ्ठल देसाई

कणकवली खरेदी विक्री संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य…