Category कोकण

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील फणसे येथील समुद्रात मासेमारीदरम्यान नौकेवरून बेपत्ता झालेला सुरज सूर्यकांत आचरेकर (३०, रा. मोंड झरकरवाडी) या खलाशाचा मृतदेह दोन दिवसांनी रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक…

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय

वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष वैभववाडी ( प्रतिनिधी) : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्याची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये भाजपला…

कुडाळमध्ये इंधन टंचाई

पेट्रोल-डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांची प्रचंड ओढाताण कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील बहुतांशी पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने सोमवारी सकाळपासूनच पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ असे फलक…

खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या बहुद्देशीय सभागृहाचे रामेश्वरम मंदिर ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक प्रगतीत मानाचा तुरा रोवणाऱ्या खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नियोजित भव्य बहुद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा नुकताच रामेश्वरम मंदिर ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी स्वामी राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथे संपन्न झाला. यावेळी या वास्तूची पहिली वीट स्वामीच्या हस्ते…

श्री देव कोळंबाचरणी हजारो भाविक नतमस्तक

‘मटण-भाकरी’ प्रसादासाठी भाविकांची गर्दी नांदगाव (प्रतिनिधी) : ‘मटण व भाकरी’ प्रसादासाठी प्रसिद्ध असलेली नांदगाव येथील श्रीदेव कोळंबाची जत्रा रविवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. श्री देव कोळंबाच्या जयघोषाने अवधी नांदगाव नगरी दुमदु‌मली होती श्रीदेव कोळंबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.…

देवगड- जामसंडे न. पं. साठी कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा !

देवगड (प्रतिनिधी) : नगरपंचायतीसाठी देवगड-जामसंडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा. कोर्ले-सातंडी नवीन नळपाणी योजना लवकरात लवकर करावी. तसेच रखडलेल्या आनंदवाडी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देवगड-जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्यावतीने राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव; भाविकांना सहभागाचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांना विशेष आकर्षण पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी…

देवगडमध्ये प्रथमच ‘Venticast’चा वापर -अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाची सुरुवात

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला असून, देवगड मेडिकल फाउंडेशन (DMF) येथे प्रथमच ‘Venticast’ या अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांनी फॅक्चरच्या उपचारासाठी या नव्या पिढीच्या…

श्री यशवंत कांबळे गुरुजी यांचेकडून खारेपाटण बुद्धविहारास साउंड स्पीकर भेट

खारेपाटण (संतोष पाटणकर ): शेर्पे ता. कणकवलीचे सुपुत्र व बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या सामाजिक संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री यशवंत रामचंद्र कांबळे गुरुजी यांनी नुकतीच खारेपाटण येथील बुद्धविहाराला अत्यावश्यक असणारी स्पीकर साउंड सिस्टिम भेट म्हणून…

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत तेजू पडवळकर यांची बैलजोडी विजेती !

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मालोंड सडा येथे राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक गवाणे येथील तेजू पडवळकर यांनी, द्वितीय क्रमांक अभिनव राणे – कणकवली आणि तृतीय क्रमांक अविष्कार ठाकूर यांच्या…