Category बातम्या

श्री क्षेत्र रेडीत गणरायाचा ५० वा वर्धापन दिन आज साजरा

गाभाऱ्यातील आकर्षक फळांची आरास ठरली लक्षवेधी; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी वेंगुर्ला (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र रेडी येथील विघ्नहर्ता गणराया नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा गणपती बाप्पाचा ५० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिराच्या…

अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांची रस्त्यावर उतरून कारवाई सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके…

पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर !

लायन्स क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली लायन्स क्लबच्यावतीने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर व चर्चा सत्राचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह तपासणी, स्ट्रेस व्यवस्थापन, आहार विहार,…

हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद देवगड (प्रतिनिधी) : हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच…

पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला ऊर्जितावस्था देणार – श्रावणी रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर झाल्या. यावेळी कोकिसरे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि. प. सदस्या श्रावणी रोहन रावराणे यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य या महत्वाच्या विषय…

सावंतवाडीत सायबर भामट्यांचा कहर ! बनावट गॅस कंपनीच्या फोनने महिलेला १.८५ लाखांचा गंडा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी आपला डाव साधला आहे. सर्वोदय नगर येथील एका महिलेला बनावट फोन कॉलच्या माध्यमातून तब्बल १ लाख ८५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

देवगड अध्यापक महाविद्यालयाकडून संविता आश्रमास मदत

देवगड (प्रतिनिधी) : शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर अध्यापक महाविद्यालय, देवगड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सविता आश्रम, पणदूर येथे निराधार व्यक्तींच्या सानिध्यात सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी…

कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कसाल (प्रतिनिधी) : कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी बुधवार दि. १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

माजी वाहतूक निरीक्षक बी एल जाधव यांचेकडून

तळेरे एस टी बस स्थानकला कार्यालयीन कपाट भेट खारेपाटण ( संतोष पाटणकर ) : कोकिसरे ता. वैभववाडी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ कणकवली कणकवली आगाराचे सेवा निवृत्त माजी वाहतूक निरीक्षक श्री अशोक उर्फ बी एल जाधव यांनी…

शिरोडा येथे सात कोटीचे देव माशाची उलटी सदृश्य पदार्थ जप्त चौघे ताब्यात

सावंतवाडी वनविभागाची कारवाई वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे सात कोटी रुपयांची अंबरग्रीस (देव माशाची उलटी) शिरोडा येथे जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून शिरोडा येथे करण्यात आली. रणजीत…