Category कणकवली

एस.एस.पी.एम. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘व्हर्च्यूओसीक २०२६’ तांत्रिक महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली येथील सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ‘व्हर्च्यू ओसीक २०२६’ या भव्य तांत्रिक महोत्सवाचे अत्यंत उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ८ आणि ९ एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे महाविद्यालयीन परिसर तंत्रज्ञानाच्या…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले

कणकवली (प्रतिनिधी) : कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये -सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून, त्या…

कणकवलीत कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचा वाढता त्रास

सायलेन्सर बदलून नियमबाह्य वाहतूक; नागरिकांमधून तीव्र संताप कणकवली (प्रतिनिधी) : शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः काही वाहनधारक नोंदणी कालावधी संपलेल्या किंवा नियमबाह्य दुचाकींना बदल केलेले सायलेन्सर लावून मोठा आवाज करत…

कोकण विकासाचे शिल्पकार खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त हरकुळ बुद्रुक विभागात विशेष कार्यक्रम

गणेश याग सह 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचा होणार सत्कार माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि प सदस्य मनोज रावराणेंचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त…

कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य कार्यक्रम

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती पुस्तक भेट उपक्रम आणि सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आकर्षण कणकवली (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी कणकवलीत मोठ्या उत्साहात साजरा होणार…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा…

बंधाऱ्यावरून जाताना दुचाकी घसरली

शिवडाव जाधववाडी येथील १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील गड नदी पात्रात शिवडाव ते सांगवे दरम्यानच्या कच्च्या बंधाऱ्यावरून जात असताना दुचाकी घसरल्याने १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. उत्कर्ष…

चुलीवर भाकरी करत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस टंचाईविरोधात कणकवलीत अनोखा निषेध कणकवली (प्रतिनिधी) : देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडून महिलांनी भाकरी व खिचडी तयार करत…

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरट पावणादेवी मंदिरनजीक दुचाकी अपघात, दोन तरुण जखमी

पत्रकार भगवान लोके यांचे प्रसंगावधान, जखमींना वेळेत मिळाले उपचार कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिराजवळ दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द,…

कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय !

उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था; बेशिस्त वाहनांवर कडक कारवाईचा इशारा शहरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतीचे पूर्ण सहकार्य मिळणार नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष…