Category कोकण

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडीच्यावतीने शहर मर्यादित पाककला स्पर्धा रविवारी, १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा नगरवाचनालय हॉल, कणकवली येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या स्पर्धेची थीम…

जामसंडेतील दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : देवगडहून जामसंडेच्या दिशेने दुचाकीने घरी परतत असताना गायीला धडक बसल्याने मिलिंद शामराव घाडी (४०, मूळ रा. तळवडे-देवगड, सध्या रा. जामसंडे) हा गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पश्चात आई,…

पुढील दोन आठवडे पाऊस कमीच

पुणे (प्रतिनिधी) : देशात तसेच राज्यात पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाचे अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही कोकण, गोवा किनारपट्टीवर पावसाची स्थिती बरी असेल, मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाच्या भागात पावसाची तूट राहणार असल्याचे चित्र आहे. मोसमी…

तळेरे–वैभववाडी रोडवर भरधाव वाहनाची बैलाला धडक, बैल गंभीर जखमी

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे–वैभववाडी मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका बैलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बैलाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बैल गंभीर…

शांततेच्या आंदोलनात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले तर जेलभरो आंदोलन करू !

मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, अमित सामंत, सुशांत नाईक, धीरज परब यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना इशारा कणकवली ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आहेत. परंतु जमावबंदी सारख्या कलमाचा…

​कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र दळवी यांची एकमताने निवड

​कळसुली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र पांडुरंग दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी नूतन उपसरपंच दळवी यांचे अभिनंदन केले.​निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांनी नूतन…

शिक्षकांच्या बीएलओ नेमणूकीमुळे विद्यार्थ्यांचे होतेय शैशणिक नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या सर्वत्र मतदार याद्यांचे अपडेट तथा पुनर्निरीक्षण चे काम जोरदार सुरू असून याकरिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बी एल ओ चे काम दिल्यामुळे त्यांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करावा लागत…

सावली जनशिक्षण संस्थेतर्फे तरंदळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सावली…

कणकवलीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : मागील अनेक दिवसांपासून थांबलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर कणकवली नगरपंचायतीने शुक्रवारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाखालील जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी करण्यात येणार आहे. त्याच…

‘प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटने’च्या जिल्हा शाखेची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या एकजुटीचा नवा अध्याय सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वाढती अशैक्षणिक कामे, ऑनलाइन कामांचा बोजा आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांसमोर आव्हाने वाढली असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी मतभेद बाजूला सारून एकत्र येत इतिहास घडवला आहे. जिल्ह्यात प्रथमच ‘महाराष्ट्र राज्य…