Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रुग्णांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मा. आमदार श्री. दीपक केसरकर आणि मा. आमदार श्री. निलेश राणे यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी व विभागांना आवश्यक मार्गदर्शन करून प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

सिंधुदुर्गातील नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत कोणतीही अडचण भेडसावू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील.