खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलिस स्टेशनमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली.खारेपाटण पोलिस स्टेशनचे आऊट पोस्ट चे हवालदार श्री मिलिंद देसाई, पोलिस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी गणपती बाप्पाच्या आगमनाचे स्वागत केले.
खारेपाटण पोलिस स्टेशन हे ब्रिटिश कालीन पोलिस ठाणे असून येथील गणपतीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी दरवर्षी गणेशचतुर्थीला येथील पोलिस स्टेशनमध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते.गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळावर दि.१५ सप्टेंबर २०२६ रोजी येथील गणपतीचे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर,खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव,माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामकांत राऊत,माजी उपसरपंच इस्माईल मुकादम,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर ग्रामपंचायत सदस्य श्री सुधाकर ढेकणे,किरण कर्ले यांनी खारेपाटण पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देत येथील गणपतीचे दर्शन घेतले.तर खारेपाटण गावातील सर्व गणपती विसर्जन होते. त्याचवेळी खारेपाटण पोलिस स्टेशन मधील गणपती मूर्तीचे देखील सर्वाबरोबर विसर्जन केले जाते.













